📢 महत्त्वाची सूचना
विषय : आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या (पुरुष) व्हॉलीबॉल स्पर्धेबाबत.
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या (पुरुष) व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित वेळापत्रकानुसार नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहेत.
तरी सर्व प्राचार्य, संचालक व संबंधित प्राध्यापकांनी याची विशेष नोंद घ्यावी. तसेच आपल्या महाविद्यालयातील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाचा सहभाग सुनिश्चित करून सदर स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील, याची दक्षता घ्यावी.
सर्व संबंधितांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी.
शारीरिक शिक्षण विभाग
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर
आयोजक